चुकीचे काम झाल्याचा आरोप; पाण्यातूनच काढली वाहनचालकांनी वाट…
सावंतवाडी ता.०७: अनधिकृत उत्खननामुळे वादग्रस्त ठरलेला बांधा येथील टोल नाका मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.आज दुपारी झालेल्या पावसात महामार्गावर तब्बल गुडघाभर पाणी होते.अशा परिस्थितीत गुडघाभर पाण्यातून काही वाहन चालकांना आपली वाहने हाकावी लागली.दरम्यान चुकीच्या पद्धतीने हे काम झाल्याने परिसरात पाणी साठले,असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला.तसेच नाक्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी योग्य ते नियोजन करा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बांदा टोल नाका परिसरात आज मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूने पाणीच-पाणी झाले होत.हा भाग सकल असल्यामुळे कापलेल्या डोंगरावरून येणारे पाणी थेट रस्त्यावर साचले होते.त्यामुळे त्याठिकाणी पूरजन्य सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.तशाच परिस्थितीत काही अतिउत्साही वाहन चालक त्या ठिकाणी पाण्यातून गाडी हाकत होते.दरम्यान तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला.यावेळी एका बाजूने पाणी खोल असल्यामुळे त्यांनी अनेक वाहनचालकांना वाट दाखवली.या सर्व प्रकारानंतर मात्र त्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.