कणकवली तालुक्याचा बारावीचा निकाल ९६. ८० टक्के…

9
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सेजल परब, प्राची मेस्त्री, सानिका सावंत तालुक्‍यात अव्वल…

कणकवली,ता. २५ ः बारावी परीक्षेत कणकवली तालुक्‍याचा निकाल ९६.८० टक्‍के एवढा लागला आहे. तर कणकवली महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची सेजल परब हिने ९४.०० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्राची मेस्त्री हिने ९३.८३ टक्‍के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर सानिका सावंत हिने ९३.५० टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
कणकवली तालुक्‍यात हरकुळ बुद्रुक ज्‍युनिअर कॉलेज, आयडियल इंग्लिश स्कूल, एस.एम.हायस्कूल, खारेपाटण हायस्कूल आणि फोंडाघाट येथील मराठे ज्‍युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्‍के लागला आहे. तर तालुक्यातील १४१ विद्यार्थी विशेष श्रेणीत अाले. प्रथम श्रेणीत ८०२, द्वितीय श्रेणीत ८३३ आणि पास श्रेणीत १०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कणकवली तालुक्‍यातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्‍य शाखेत मनाली तायशेट्ये ८४.६७ टक्‍के, समर्थ लाड ८४.१७ टक्‍के, कलाशाखेत चिन्मयी जावडेकर ७३.८३ टक्‍के, बुशरा बागवान ७३.१७ टक्‍के, तन्वी भाबले ६७.६७ टक्‍के, व्यवसाय शाखेत अंकिता नकाशे ७६.४५ टक्‍के, गितांजली पवार ७३.६७ टक्‍के, सुकन्या आडेलकर ७१.३६ टक्‍के यांचा समावेश आहे.
तालुक्‍यातील इतर ज्‍युनिअर कॉलेजचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.
कनेडी ज्यूनियर कॉलेजचा निकाल ९९.४० टक्के लागला आहे. कला शाखेतून प्रथम सेजल सुनिल पाटील ८० टक्के, लक्ष्मण अशोक सदडेकर ७५ , हर्षदा नितीन मेस्त्री ७५, सायली श्रीधर सावंत ७०.१७ , विज्ञान शाखेत स्नेहा संजय पवार ८०.५०, सलोनी कदम ७७.८३, गौरी दिपक देसाई ७७.३३ गुण. वाणिज्यमधुन दीप्ती विलास गायकवाड़ ८६.१७, मितेश राजेश पाताडे ८२.५०, द्विक्षा अरुण वारंग ८०.६७ गुण.
फोंडाघाट ज्युनिअरचा ९८.९६ टक्के लागला असून कलाशाखेतून सारिका येंडे ७२.५०, रिया मेस्त्री ७१.८३, मयुरी होळकर ७१.५०, वाणिज्य यंश दळवी ७९.१७, विठ्ठल बोडके ७६.८३, देवदिप परब ७६.३३. व्यवसाय विक्रम ठुकरूल ७४.३३, रोहीत वाघाटे ७२.६७, सुदेश सापळे ७२.५० आणि अनिश गुरव ७२.५०, विज्ञानमधुन प्राची लाड ७६.५०, पुजा राठेड ७६, रूपेश गवळी ७१.५० टक्के गुण मिळाले. मराठे फोंडाघाट विज्ञान शाखेतून ३६ पैकी २८ विशेष श्रेणीत व ८ मुले प्रथम श्रेणीत पास झाली. यात चिन्मयी कानडे ७३.५०, ऐश्वर्या माने ६८.५०, शोभना जंगम ६७.८३ गुण.
खारेपाटण ज्यूनिअर विज्ञान शाखेतून स्नेहा गुरव ७०.५०, दिपाली दयाणी ७३, सानिया राऊत ७२.८३, कलाशाखा अमिशा पवार ७७.६६, तन्वी तांबे ७३.८३, माधवी शेंगाळे ७१.१६, वाणिज्य शाखा सानिका कुलकर्णी ८६.६६, झुल्फा काझी ८६.१७, सुहानी मोरे ८६ आणि व्यवसाय अभ्य़ास क्रमातून दिपक इंगळे ६६.५०, अरस्लान ठाणगे ६९.८३, पुनम गुंड्ये ७४.५० गुण पटकावले.
कासार्डे ज्युनिअर काला शाखा दिक्षीता लाड ७६.८३, मालिनी लाड ७६.७६, शुरज दळवी ६४.३३, वाणिज्य अमित तर्फे ८४.३६, सुश्मिता ठुकरूल ८४.१४, विशाखा राणे ७८.५०, विज्ञान स्वरांगी जठार ७२.००, स्नेहा काळे ७१.८३, चैत्राली कुडतडकर ७१.३३. महाडीक क.महाविद्याल तळेरे अनुष्का घाडी ७६.३३, देवेन दुखंडे ७२.००, ऋतिक घाडी ६५.१७, वाणिज्य़ स्नेहल तळेकर ८७.८३, प्रतिक्षा गिरी ८६.३३, मिताली चव्हाण ८४.५० गुण पटकावले.
वरवडे येथील आयडिअल ज्युनिअरच्या वाणिज्य शाखेतून दिक्षा कुबल ७२.३३, आदित्य पटेल ७१.८३, प्रिती दळवी ७९ टक्के, विज्ञान शाखेतून प्रियांका पारकर ८७, सनिल मोरे ८२.५० आणि अद्वेय गुजर ८०.८३,
कळसुली कनिष्ठ कला शाखेतून सोनाली ठाकूर ७८.५०, मनिषा कदम ७६, मयुरी सावंत ७१.६७. वाणिज्य दर्शना परब ८८, प्रिती परब ८४.६७, साक्षी लाड ८३ टक्के गुण.
कणकवली एस.एम. हायस्कूलच्या विज्ञान शाखेतून रघुनंदन राणे ७०.६७, दिव्या सुतार ६७.३३, वाणिज्य मनीष गिरकर ६७.३३, रसिका गुरव ६३.६७, दिपेश मोदी ६३.१७ गुण, व्यावसाय अभ्या. किशोर होळकर ७०.००, हर्षाली मांजरेकर ७९.५०, प्रणव निकम ६९.३६ गुण पटकावले.

\