घाटमार्गात एकेरी वाहतूक सुरू; दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर
वैभववाडी ता.०७;तालुक्यात धुवाॕधार कोसळणा-या पावसाने करुळ घाटात चार ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान सा. बां. ने दरडी हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. सायंकाळी उशिरा पर्यंत दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गगनबावडा तालुक्यात चार ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्ग गेली सात दिवस बंद आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडामार्गे वळविण्यात आली आहे. बुधवारी पावसाने थोडी उसंत घेतली आहे. बुधवारी पहाटे करुळ घाटात चार ठिकाणी दरडी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी १० वा. नंतर सा. बां चे शाखा अभियंता निलेश सुतार व कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यातील दरडी व मातीचा ढिग बाजूला केला. त्यानंतर घाटमार्गात एकेरी वाहतूक सुरू केली. सायंकाळी उशिरा दरडी हटविण्याचे कामा युद्ध पातळीवर सुरू होते.
फोटो- करुळ घाटात दरड.