आंबोली सैनिक स्कूलचा बारावीचा निकाल १०० टक्के…

16
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.२५: येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. शाळेने सलग १३ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून ०१ विद्यार्थ्याना विशेष गुणवत्ता तर उर्वरीत सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीण झाले आहेत. यामध्ये शाळेमधून कॅडेट सुजल संतोष साटेलकर याने ८०.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, कॅडेट अविष्कार राजेंद्र पाटील याने ७४.८३ टक्के गुण मिळवून व्दितीय तर कॅडेट- दत्तराज प्रसाद नराम याने ७३.८३ टक्के गुण मिळवून तृतीय कमांक पटकावला आहे.

आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी एनडीए लेखी परिक्षेत तसेच जीईई सेट, नीट परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी नेकी मर्चंट नेवी, बहुराष्ट्रीय कंपनी आदी क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण कवायत युद्ध कौशल्य आत्मसंरक्षण, विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षांचे मागर्दशन केले जाते.

१०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्यावायत संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस सचिव सुनिल राऊळ तसेच संचालक जाय डॉन्टस, शंकर गावडे, शिवाजी परय व सर्व संचालक, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे तसेच, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

\