शहिद मेजर कौस्तुभ राणे यांना स्वाभिमान पक्षाच्यावतीने वाहिली श्रद्धांजली

140
2

वैभववाडी.ता,७: वैभववाडीचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना वैभववाडी पक्ष कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दहशतवाद्यांशी लढताना शहीद कौस्तुभ राणे यांना ७ ऑगस्ट २०१८ रोजी हौतात्म्य प्राप्त झाले होते. तालुक्यातील अनेक प्रतिष्ठान, मंडळे, रावराणे समाज यांच्या वतीने कौस्तुभ राणे यांना बुधवारी त्यांच्या स्मृती दिनी अनेक ठिकाणी आदरांजली कार्यक्रम पार पडला.
वैभववाडी स्वाभिमान पक्षाच्या वतीने मेजर कौस्तुभ राणे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भाजपा नेत्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही याप्रसंगी श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, नगरसेविका अक्षता जैतापकर, माजी नगरसेवक संताजी रावराणे, पुंडलिक साळुंखे, अवि साळुंखे, प्रशांत पवार, अशिष रावराणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रथम स्मृती दिनी श्रध्दांजली वाहताना वैभववाडी स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते.

4