मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठ जलमय…

2

सावंतवाडी ता.०७: गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तळवडे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.हे पाणी काही दुकानात शिरल्याचा प्रकार सुद्धा घडला आहे.त्यामुळे या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यासह सावंतवाडी तालुक्याला सुद्धा झोडपून काढले.दरम्यान आज दिवसभर पावसाचे प्रमाण कायम राहिले आहे.या पावसामुळे ग्रामीण भागातील जन-जीवन विस्कळित झाले.तर अनेक बाजारपेठेत पाणी साचल्याचे प्रकार समोर आले आहेत.दरम्यान या पावसाचा सर्वाधिक फटका उद्योग धंद्याना बसला आहे.

14

4