वेंगुर्ले नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापनदिन सोहळ्याची उत्सुकता…

2

दीपक केसरकर; नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी गौरवोद्गार…

वेंगुर्ले,ता.२६: दिवसेंदिवस वेंगुर्ले नगरपरिषद प्रगतीची शिखरे गाठत असताना या नगरपरिषदेचा १५० वा वर्धापन दिन सोहळा कसा असेल याची उत्सुकता आत्तापासूनच लागली आहे, असे गौरोदगार शालेय शिक्षण मंत्री तथा या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना काढले.

वेंगुर्ले नगरपरीषदेच्या १४७ व्या वर्धापन दिनाचे व नाटकाकार मधुसुदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून नगरपरीषदेच्या कॅम्प येथील नाटककार मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. केसरकर बोलत होते. दरम्यान या महोत्सवाच्या उद्घाटनाचा मान मंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना दिला आणि त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी, वेंगुर्लेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सुनिल डुबळे, नम्रता कुबल, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, आर्कटेक्ट अमित कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना श्री. केसरकर म्हणाले, मी विकासाचे व्हीजन ठेवूनच विकास कामे करत आहे. देशातील पहिली पर्यटन पाणबुडी वेंगुर्लेत येथे सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत हा प्रकल्प जर सरकार मार्फत करणे शक्य झाले नाही तर आपण उद्योजकांमार्फत विकासासाठी खाजगी गुंतवणूक करून हा प्रकल्प करणारच. त्यामुळे देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीचे वेंगुर्लेतील स्वप्न सत्त्यात उतरविणार असेही ठामपणे त्यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुका हि नाटककार, कवि, लेखक तसेच कलाकार यांची भूमी आहे. या भागांत मोठ्या प्रमाणांत साहित्यिक आहेत. उभादांडा येथे कविववर्य मंगेश पाडगांवकर यांचे कवितांचे स्मारकाचे संदर्भात शालेय शिक्षण संचालकांना तो गाव देव स्मारकाच्या जागेची पहाणी करण्यास पाठविले होते. त्यांनी उभादांडा हा गांव व स्मारकाची जागा हि पाचगणी पर्यटन क्षेत्रापेक्षाही सुंदर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कवितांच्या गावासाठी लागतील तेवढे पैसे दिले जातील. आपल्या भागात पर्यटन विकासास भरपूर वाव आहे. मुंबई येथे मराठी भवन बांधकाम होतेय. प्रतेक मराठी माणसांसाठी हि गोष्ट अभिमानस्पद आहे. वेंगुर्ले शहरात लवकरच समुद्र किनारी सायकल ट्रकही पर्यटन दृष्ट्या वेंगुर्ले शहरांत साकारणार आहे. त्यासाठी निधीची उपलब्दता केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेसह विविध क्षेत्रात केलेली प्रगती पाहून अभिमान वाटतो. १४७ वर्षे झालेली ही भारतातील एक जुनी नगरपरिषद असून चांगल्या कामातून मिळविलेल्या पुरस्कारांची जत्रा येथे आहे. तसेच सुंदर असा हा नाटककार मधुसूदन कालेलकर हॉल, तसेच म्युझियम ही प्रगती अजून वाढावी यासाठीच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर वेंगुर्लेला खूप निधी देत असतात. प्रशासन म्हणून आम्ही ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत असे अभिवचन त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी यांनी केले. यावेळी नगरपरीषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नाटक पहाण्यास आलेले रसिक व नागरीक उपस्थित होते.

92

4