वेंगुर्ले शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या वाहिन्‍या बदलणार…

2

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन..

वेंगुर्ले,ता.२६: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील वेंगुर्ला नळपाणी पुरवठा योजनेसाठी अल्‍ट्रासोनिक स्वयंचलित वॉटर मीटर पुरवठा करुन कार्यन्वित करणे व वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजना सुधारीत करणेसाठी शहरातील अस्तित्‍वातील वितरण वाहिन्‍या बदलणे (पहिला टप्‍पा) या कामांचा भूमीपूजन सोहळा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे हस्ते वेंगुर्ले कॅम्प येथे संपन्न झाला.

वेंगुर्ला नगरपरिषदेला १४७ वर्षाची समृद्ध परंपरा लाभलेली असून नगरपरिषदेच्‍या शिरपेचात मानाचा तुरा ठरावा अशी आणखी दोन कामे शहरात होत आहेत. या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे स्वागत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुका अध्यक्ष सुहास गवंडकर तसेच प्रशांत आपटे, सुनील डूबळे, नम्रता कुबल, ॲड. बाविस्कर, संतोष परब, डॉ. आर. एम. परब, गणपत केळुसकर, ठेकेदार एस. एल. ठाकूर यांच्यासह वेंगुर्ले नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

136

4