मळगाव-मेट परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प…

2

सावंतवाडी ता.०७: येथील मळगाव मेट परिसरात रस्त्यावर झाड पडल्यामुळे या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.ही घटना आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान घटनास्थळी झाड बाजूला करू रस्ता सुरळीत करण्याचे कार्य सुरू आहे.
गेले तीन दिवस या ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाचा जोर एवढा वाढला आहे.कि ठिक- ठिकाणी मोठ्या पडझड झाल्याच्या घटना समोर येत आहेत.त्यात रस्त्यावर कोसळणाऱ्या दरडी व झाडामुळे याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे तर याचा सर्वाधिक फटका एसटी फेऱ्यांना बसलेला दिसून येत आहे.दरम्यान आज येथील घाटीत कोसळलेल्या झाडांमुळे सुद्धा काही काळ वाहतुक ठप्प होण्याची शक्यता आहे.

4