मालवण, ता. ७ : मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. गेले दोन तीन दिवस नद्यांना आलेला पूर आज काही प्रमाणात ओसरल्याचे दिसून आले. किनारपट्टीस उधाणाच्या लाटांचा तडाखा सुरूच आहे. खाडीकिनाऱ्याच्या अनेक घरांना पाण्याने वेढा घातला असून तो कायम आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानीच्या घटना घडल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी गुडघाभर पाण्यातून पायी चालत तळाशिलमध्ये ज्या ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसले त्या भागास भेट देत ग्रामस्थांची विचारपूस केली. पुराच्या पाण्यात ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले त्यांना तत्काळ नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी अशा सूचना महसुलच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच आबा कांदळकर, उपसरपंच, उदय दुखंडे, विनायक परब, नारायण कुबल, गणेश तोंडवळकर, जगदीश पांगे, समीर लब्दे, अनिल गावकर, प्रकाश वराडकर यासह शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
तळाशील किनारपट्टीस सागरी अतिक्रमणाचा जोरदार तडाखा बसला आहे. बंधारा नसलेल्या ठिकाणी जमिनीचा भाग समुद्र गिळंकृत करत आहे. या भागासही आमदार नाईक यांनी भेट देत पाहणी केली. मसुरे, चिंदर, काळसे, आंबेरी यासह खोतजूवा बेटावर पाण्याच्या वेढ्यात दोन दिवस अडकलेल्या ग्रामस्थांची माहितीही प्रशासनाकडून त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर दुपारी देवबाग किनारपट्टीची पाहणी त्यांनी केली.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, आरोग्य सभापती पंकज सादये, शहरप्रमुख बाबी जोगी, उपविभागप्रमुख अनिल केळुसकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पूर व सागरी अतिक्रमण बाधित ग्रामस्थ व कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. कुटुंबातील एका सदस्याला एक हजार व संपूर्ण कुटुंबाला जास्तीत जास्त ५ हजार याप्रमाणे शासकीय मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व कुटुंबांचा अहवाल तत्काळ तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याच्या सुचनाही आमदार नाईक यांनी महसूल प्रशासनाला यावेळी दिल्या.
मालवणात पावसाचा कहर | गुडघाभर पाण्यातून पायपीट करत आमदारांनी केली नुकसानीची पाहणी
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES