सिंधुदुर्गनगरी : हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजनेतील नुकसान भरपाई,जिल्हातील ३९ सर्कल स्थरावर बसविण्यात आलेल्या हवामान मापक यंत्रणेच्या आधारावर दिली जाते. त्यातील १३ सर्कल मधील आंबा काजू शेतकर्यांना फळपिक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळाली नाही. खरेतर हि यंत्रणा सदोष असून तापमानाची नोंद होत नाही व ती माहितीही उपलब्ध होत नाही. त्यामुळे वंचीत राहिलेल्या २७९८ आंबा काजू शेतकर्यांना विमा कंपनीने लाभ द्यावा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी केली आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेत जिल्हातील आंबा पिकासाठी १२०३८ तर काजू पिकासाठी २१९२ शेतकर्यांनी विमा हप्ता कंपनीकडे जमा केला आहे. यातील १२१३८ शेतकर्यांना विमा कंपनीने ३८.८६ कोटी नुकसान भरपाईची रक्कम वर्ग केली आहे. मात्र देवगड बापर्डे मिठबाव शिरगाव पडेल आचरा आंबेरी मालवण श्रावण आजगाव सावंतवाडी म्हापण वेगुर्ला या १३ सर्कल मधील सुमारे २७९८ आंबा काजू शेतकरी वंचित राहिले आहेत. या शेतकर्यांनी १३. ४८ कोटी विमा हप्ता जमा करुनही केवळ सदोष हवामानयंत्राच्या आधारे या शेतकर्यांना या नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले आहे.
तापमान गारपीठ पाउस आदी पाच निकषांच्या आधारे फळ पिक विम्याचा फायदा देण्यात येतो. मात्र याची नोंद घेणारी सर्कल स्थरावरील हवामान मापण केंद्रे सदोष आहेत. जवळ जवळ असणार्या सर्कल मधिल तापमान यंत्रात एवढा फरक का? हा संशय असून हि यंत्रेच सदोश आहेत. या यंत्रानी नोंदविलेली तसपमानाची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे १३ सर्कल मधील शेतकर्यांवर अन्याय झाला आहे. तो अन्याय दूर करावा अशी मागणी सतिश सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.