सहकार्य करण्याचे ग्रामस्थांचे आवाहन; रेस्क्यू टीमला पाचारण करण्याची मागणी…
बांदा ता.०७: इन्सुली बिलेवाडी येथे झालेल्या जोरदार पावसामुळे सकाळपासूनच परिसरातील सात घरे पाण्याने वेढली आहेत.त्यात सुमारे २२ जण लोक अडकले आहेत.याबाबतची माहिती ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी दिली.तेथील पोलीस पाटील कृष्णा सावंत यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन कक्षाच्या वतीने लाईफ जॅकेट आदि साहित्य घेऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ते आपल्या सहकारी ग्रामस्थांसह प्रयत्नात आहेत.दरम्यान पावसाचा जोर वाढल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.
याबाबतची माहिती मिळताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली.परिसरात पाणी भरपूर आहे.त्यामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यांना वाचवण्यासाठी बाबल अल्मेडा टीम किंवा रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात यावे अशी मागणी गावातील लोकांकडून करण्यात आली आहे.