दरड हटविताना जेसीबी कोसळला नाल्यात…

715
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तांबोळी येथील घटना; चालक व एक ग्रामस्थ सुदैवाने बचावले…

ओटवणे ता.०७: तांबोळी येथे रस्त्यावरील दरड हटवताना जेसिबी पलटी होऊन थेट नाल्यात गेला.मात्र सुदैवाने जेसिबी चालक व एक ग्रामस्थ यांना किरकोळ दुखापत झाली.तांबोळी माऊली मंदिर नजीक चाफेवाडी येथे मंगळवारी रस्त्यावर दरड पडल्याने हा मार्ग बंद होता.बुधवारी सकाळी जेसिबीच साह्याने दरड हटविण्याचे काम सुरू होते.याचवेळी दरडीचा काही भाग जेसिबीवर पडला.त्यामुळे जेसिबी घसरून थेट लगतच्या नाल्यात गेला.
जेसिबी चालक व बाजूला उभ्या असलेल्या एका ग्रामस्थाने बाजूला उडी मारल्याने ते बालबाल बचावले.जेसिबीला अपघात झाल्याने दरड हटविण्याचे काम थांबले आहे.त्यामुळे तांबोळी मार्ग वाहतुकीस बंद आहे.तर असनिये घारपी मार्गावर दरड कोसळून तोही मार्ग बंद असल्याने असनिये,तांबोळी,घारपी या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

\