मुलांची सुरक्षितता महत्वाची त्यामुळे गरज असल्यास शाळा बंद ठेवा

822
2
Google search engine
Google search engine

शिक्षणाधिकारी अशोक कडुस: सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांच्या कोर्टात

सावंतवाडी ता, ७ :पावसाचा जोर वाढत आहे हे नक्की असले तरी उद्यापासून शाळा सुरू राहणार आहे. ज्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती ओढवेल त्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश शिक्षणाधिकारी अशोक खडूस यांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले सद्यस्थितीत अद्यापही काहीभागात अतिवृष्टी सुरूच आहे.दळणवळनाचे मार्ग बंद आहेत किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत अशा स्थितीत यापुढे अतिवृष्टीच्या कालखंडात स्थानिक भौगोलिक परिस्थिती पाहून व विचार करून शाळेला सुट्टी घेणेबाबतचा निर्णय त्या-त्या मुख्याध्यापकांनी स्वतंत्र घ्यावा.मात्र कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे त्यासाठी सर्व शिक्षकांना स्टाफ मिटिंग घेऊन आवश्यक त्या सूचना द्याव्यात.विद्यार्थी ये-जा करीत असलेल्या मार्गांचा आढावा घ्यावा.विदयार्थी घरी पोहोचल्याची खातरजमा करावी.RTE नुसार आवश्यक शैक्षणिक कामकाजाचे दिवस व अध्यापनाच्या तासिका सुट्टीतील इतर दिवशी भरून काढावेत असे त्यांनी सांगितले.