माडखोल धवडकी येथे रस्त्यावर पाणी,आंबोली सावंतवाडी राज्यमार्ग बंद

2

सावंतवाडी, ता.७ : माडखोल धवडकी येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे आंबोली-सावंतवाडी राज्य मार्ग पुन्हा एकदा बंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली आहे.
याबाबतची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. लोकांनी व प्रवाशांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे.आंबोली घाट कोसळल्यामुळे काल तब्बल तीस तास वाहतूक बंद होती. मात्र आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे पुन्हा हा राज्यमार्ग बंद झाला आहे.

40

4