Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
भालचंद्र पिळणकर यांची केली विचारपूस ; पोलिसांना शोध घेण्याच्या केल्या सूचना…
- कुडाळ, ता. ७ : तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथे भालचंद्र पिळणकर यांची पत्नी भाग्यश्री पीळणकर ही बेपत्ता झाली आहे. त्यांच्या घरी जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. कर्ली खाडीला मोठ्या प्रमाणात पूर असल्याने त्या ठिकाणी जाणे हे तसे धोकादायक होतेे. मात्र आमदार वैभव नाईक यांनी याची पर्वा न करता ग्रामस्थांसमवेत थेट होडीतून कर्ली खाडी पार करत पिळणकर यांचे घर गाठले. पिळणकर कुटुंबियांची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
दरम्यान निवती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्याशी आम. नाईक यांनी चेंदवण येथे चर्चा करून भाग्यश्री हिचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.
तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसला असून अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या लोकांना आमदार वैभव नाईक यांनी मदतकार्य सुरू केले आहे. मालवण तालुक्यातील तोंडवळी, तळाशील, काळसे, भागात पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर आम. वैभव नाईक यांनी चेंदवण गावात भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करत विचारपूस केली. तीन ते चार फूट पुराचे पाणी घुसल्याने लोकांनी घरे सोडून जि.प. शाळा नं १ येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. याठिकाणी आम. नाईक यांनी भेट देऊन सतरंजी व ताडपत्रीचे वाटप केले.
चेंदवण मळेवाडी येथे भालचंद्र पिळणकर यांची पत्नी भाग्यश्री पिळणकर ही बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेणे सुरू आहे. त्यामुळे कुटुंबीय दुःखात आहेत. त्यांच्या घरी जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. कर्ली खाडीला मोठ्या प्रमाणात पूर असल्याने त्या ठिकाणी जाणे धोकादायक होते. मात्र आमदार नाईक यांनी याची पर्वा न करता ग्रामस्थांसमवेत थेट होडीतून कर्ली खाडी पार करत पिळणकर यांचे घर गाठले. पिळणकर कुटुंबियांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. दरम्यान निवती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. साळुंखे यांच्याशी चेंदवण येथे चर्चा करून भाग्यश्री हीचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी चेंदवण सरपंच सौ. उत्तरा धुरी, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत तेंडोलकर, उपसरपंच दिपक भरडकर, तलाठी परमेश्वर सलगर, सर्कल गुरखे, शिवसेना कुडाळ तालुका मागासवर्गीय संघटक भुपेश चेंदवणकर, शाखा प्रमुख हेमंत जुवेकर, युवासेनेचे अविनाश श्रृंगारे,किरण खोचरेकर, ग्रा.पं सदस्य रेवती तोरसकर, रवींद्र तोरसकर मंजूनाथ फडके आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.