असनियेत दरडी कोसळुन रस्ताच गायब…

2

ग्रामस्थ भितीच्या छायेखाली:प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

ओटवणे.ता, ८: असनिये गावात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असून,ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.असनिये -घारपी मार्गावर कणेवाडी येथे दरड पडून पूर्ण रस्ताच गायब झाला आहे.या ठिकाणी या आधी रस्ता होता, का हाच प्रश्न ये-जा करणार्यांना पडला आहे.
याठिकाणी मंगळवारी दरडीचा काही भाग कोसळला होता.बुधवारी रात्री आणखीन काही भाग कोसळून मोठे विवर निर्माण झाले आहेओटवणे:
असनिये गावात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असून,ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.असनिये -घारपी मार्गावर कणेवाडी येथे दरड पडून पूर्ण रस्ताच गायब झाला आहे.या ठिकाणी या आधी रस्ता होता, का हाच प्रश्न ये-जा करणार्यांना पडला आहे.
याठिकाणी मंगळवारी दरडीचा काही भाग कोसळला होता.बुधवारी रात्री आणखीन काही भाग कोसळून मोठे विवर निर्माण झाले आहे.दरम्यान, या घटनेची माहिती देऊनही प्रशासनाने कोणतहि दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
असनिये-घारपी मार्गावर कणेवाडी येथे मंगळवारी रात्री दरडीचा काही भाग रस्त्यावर येवून हा मार्ग वाहतुकीस बंद झाला होता.बुधवारी रात्री दरडीचा आणखीन काही भाग कोसळून पूर्ण रस्ताच गायब झाला.रस्त्याच्या ठिकाणी मोठी दरी निर्माण झाली आहे.रस्त्यालगत असलेले विजेचे खांबही कोसळून दरडीच्या मातीत गडप झाले आहेत.
दरड कोसळल्याने घारपी-असनिये हा रस्ताच कायमस्वरूपी बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असून,ग्रामस्थांनी तात्पुरत्या पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे..दरम्यान, या घटनेची माहिती देऊनही प्रशासनाने कोणतहि दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
असनिये-घारपी मार्गावर कणेवाडी येथे मंगळवारी रात्री दरडीचा काही भाग रस्त्यावर येवून हा मार्ग वाहतुकीस बंद झाला होता.बुधवारी रात्री दरडीचा आणखीन काही भाग कोसळून पूर्ण रस्ताच गायब झाला.रस्त्याच्या ठिकाणी मोठी दरी निर्माण झाली आहे.रस्त्यालगत असलेले विजेचे खांबही कोसळून दरडीच्या मातीत गडप झाले आहेत.
दरड कोसळल्याने घारपी-असनिये हा रस्ताच कायमस्वरूपी बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असून,ग्रामस्थांनी तात्पुरत्या पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

0

4