कोकणातील ७५ जागा लढविणार अध्यक्ष महेंद्र नाटेकर…
सिंधुदुर्गनगरी.ता,८: कोकणच्या सर्वांगीण विकासाठी स्वतंत्र कोकण राज्य होणे आवश्यक आहे. तशी मागणीही येथील जनतेची आहे. मात्र या मागणिकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता शासनाला लोकशाही पद्धतीने कोकण राज्याचे अस्तित्व दाखविन्यासाठी ऑक्टोंबर २०१९ मध्ये होवू घातलेली विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वतंत्र कोकण पार्टीने घेतला असून कोकण पट्टयातील ७५ जागा लढविणार असणार असल्याची माहिती स्वतंत्र कोकण पार्टीचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिली.
स्वतंत्र कोकण राज्य वैभवशाली आर्थिक संपन्न बनविण्याची ताकद येथील समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत आहे. कोकण राज्य स्वत:च्या पायावर आर्थिक वैभवशाली होईल. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राने कोकणावर सतत अन्याय केला. कोकणाला विकासात मागे ठेवले. त्यामुळेच या ठिकाणी साधनसंपत्ती असूनही शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन, कृषी, फलोद्यान, मत्स्यव्यवसाय अशा सर्व स्तरांवर अनुशेष राहिला. नोकऱ्या, रोजगार निर्माण होऊ शकला नाही,
कोकणची मातृभाषा, संस्कृती, निसर्ग, विकासाचे निकष, लोकांची भिन्न मानसिकता, सागरी हवामान आणि सह्य़ाद्री पर्वतरांगांची भिंत या साऱ्या गोष्टींचा प्रादेशिक विचार झाल्यास कोकणला स्वतंत्र राज्यनिर्मिती मिळायला हवी होती. मुंबई वाचविण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोकणाचेच सर्वाधिक हुतात्मे बनले, त्यामुळे गोवा, केरळ, तामिळनाडू आदी सागरी राज्यांप्रमाणे
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेले स्वतंत्र कोकणचे सागरी राज्य निर्माण होणे गरजेचे आहे.स्वतंत्र कोकण राज्य झाले तरच रोजगार, नोकऱ्या, उद्योग, पर्यटन, कृषी, फलोद्यान, मत्स्यव्यवसाय, शिक्षण, आरोग्य, संस्कृती, क्रीडा अशा सर्व पातळीवर झपाटय़ाने विकास होईल, असा विश्वास प्रा. नाटेकर यांनी व्यक्त केला.
कोकणच्या सर्वांगीण विकासाठी स्वतंत्र कोकण राज्य होणे आवश्यक आहे. तशी मागणीही येथील जनतेची आहे. त्यासाठी स्वतंत्र कोकण राज्य संघटनेने अनेक वेळा आंदोलने केली. मात्र स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणिकडे येथील लोकप्रतिनिधी आणि शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शासनाला लोकशाही पद्धतीने कोकण राज्याचे अस्तित्व दाखविन्यासाठी आणि येथील जनतेची मागणी मतांच्या आधारे दाखविन्यासाठी ऑक्टोंबर २०१९ मध्ये होवू घातलेली विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वतंत्र कोकण पार्टीने घेतला असून कोकण पट्टयातील ७५ जागा लढविणार असणार असल्याची माहिती स्वतंत्र कोकण पार्टीचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिली.