कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी दांडीतील मच्छीमारांची रेस्क्यू टीम रवाना…

2

मालवण, ता. ८ : कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दांडी येथील मच्छीमारांची रेस्क्यू टीम रवाना झाली आहे.
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मदतीसाठी दांडी येथील मच्छीमारांच्या रेस्क्यू टीमने कोल्हापूर येथे जात मदत कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज ही रेस्क्यू टीम कोल्हापूर येथे रवाना झाली.
रेस्क्यू टीम मध्ये अन्वय प्रभू, राजू परब, नारायण आडकर, आबा आडकर, अजित आचरेकर, भूषण आचरेकर, रोहित आडकर, नाना जाधव, नारायण रोगे, भाई केळुसकर आदी सहभागी झाले आहेत. या सर्वांना मदत कार्य यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर, उपशहर प्रमुख किरण वाळके, महेश शिरपुटे, शाखा प्रमुख मोहन मराळ, युवासेना उपशहर युवा अधिकारी अक्षय रेवंडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

39

4