पोलीस व्हॅन डीवाईडर चढल्यामुळे कुडाळात अपघात

2

कुडाळ.ता, ८: मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी दरम्यान पोलिस व्हॅनला अपघात झाला आहे.यात एक चालक जखमी झाल्याचे समजते, घटनास्थळावर गर्दी झाली आहे. कुडाळवरून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकाचा अचानक ताबा सुटल्यामुळे गाडी थेट डीव्हायडरवर चढली असून पुन्हा ती कुडाळच्या दिशेने परतून राहीली आहे. आत मध्ये पोलिस आहेत .घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

20

4