सावंतवाडी शहरात पेट्रोलचा तुटवडा

2

पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा; गर्दीच्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची

सावंतवाडी ता.०८: शहरात आज सकाळपासूनच पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहेत.येथील एका पेट्रोल पंपचा पुरवठा पूर्णतः निकामी झाला असून २ पेट्रोल पंपच्या बाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.दरम्यान या गर्दित शाब्दिक बाचाबाची झाल्याचे प्रकार सुद्धा आज येथे घडले.तर या पेट्रोल टंचाईमुळे वाहनचालकांची मोठी गैर होण्याचे शक्यता आहे.
गेले चार-पाच दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.त्यामुळे या ठिकाणी पेट्रोल पुरवठा करणारे टँकर पोहोचू शकले नाहीत.याचा परिणाम येथील पेट्रोल पंपावर झालेला दिसून येत आहे.शहरातील एका पेट्रोल पंपचा पेट्रोल पुरवठा पूर्णतः संपला आहे.तर दोन पेट्रोल पंप वर वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत.त्यामुळे या गर्दीत काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाल्याचे प्रकार सुद्धा घडले.हा तुटवडा कायम राहिल्यास वाहनचालकांची मोठी गैरसोय होणार आहे.तर याचा फटका उद्योग व्यवसायांना सुद्धा बसणार आहे.त्यामुळे वाहन पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

1

4