सावंतवाडी जिल्हा कारागृह नजीक दोन दुचाकी अपघात…

270
2

दोन महिला जखमी; गाड्यांचे मोठे नुकसान…

सावंतवाडी, ता.०८: येथील जिल्हा कारागृहा नजीक दोन दुचाकी समोरासमोर झालेल्या धडकेत दोन महिला जखमी झाल्या आहेत.तर समोरील दुचाकीस्वार युवकाने अपघातानंतर त्या ठिकाणाहून पलायन केले.हा अपघात आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की,या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने यात मोठी जीवितहानी झाली नाही.दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.

4