आंबोली मुख्य धबधब्यासमोर दरड कोसळून रस्ता खचला…

1291
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एकेरी वाहतूक सुरू;मोठ्या वाहनांना प्रवेश बंद…

आंबोली ता.०८: येथील मुख्य धबधबा समोर आज पहाटे दरड कोसळल्यामुळे दरीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात रस्ता खचला आहे.त्यामुळे या ठिकाणाहून सद्यस्थितीत एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.या घटनेची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सावंतवाडी तहसीलदार व पोलिसांना संपर्क साधून दिली.दरम्यान सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या वाहनांना थांबवण्यासाठी दाणोली येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आंबोली घाटात मुसळधार झालेल्या पावसामुळे पाच ते सहा ठिकाणी रस्ता खचल्याचे प्रकार घडले आहेत.तर ठिक-ठिकाणी दरड कोसळत असल्याने आंबोली घाट सद्यस्थितीत वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. मुसळधार पावसामुळे येथील धबधब्यांचा प्रवाह वाढल्याने काही ठिकाणी धबधब्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहत आहे तर काही ठिकाणी या प्रवाहासोबत मोठ-मोठे दगड , माती रस्त्यावर येत आहे.त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन आपली वाहने हाकावी लागत आहेत.दरम्यान रस्ता खचलेल्या काही ठिकाणी जिओ केबल टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती.मात्र ती व्यवस्थित न बुजविल्याने हा प्रकार घडला असा आरोप श्री.चव्हाण यांनी केला आहे.

\