हिंदू जनजागृती समितीचे निवेदन
सिंधुदुर्गनगरी.ता,८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वोच्य न्यायालयाच्या ७ न्यायामूर्तिंच्या घटना खंडपीठाने गोहत्येच्या विरोधात २६ ऑक्टोबर २००५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री यांच्यासाठी सादर केले. बकरी ईद निमित्त होणाऱ्या गो हत्या थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
देशातील २० राज्यात गोहत्या विरुद्ध कायदे करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. गोहत्येच्या तुलनेत होमातेचे दूध, शेण, मूत्र आदिंपासून शेतकरी मोठे उत्पन्न घेतात. इस्लाममधील ‘कुराण’ ‘हदिस’ व अन्य कोणत्याही धार्मिक ग्रंथात गोहत्या करा अथवा गोहत्या हा मूसलमानांचा धार्मिक अधिकार आहे’ असे नमूद केल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे हिंदू धर्मात इको फ्रेंडली गणेशोत्सव, होळी, दिवाळी साजरी केली जाते. त्याप्रमाणे इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी, अशीही यावेळी मागणी या निवेदनात केली आहे.