नारळी पौर्णिमेनिमित्त १४ ऑगस्टला समूहनृत्य स्पर्धा…

2

आम. वैभव नाईक यांची संकल्पना ; बंदर जेटी येथे आयोजन…

मालवण.ता.८: शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून नारळी पौर्णिमेनिमित्त १४ ऑगस्टला बंदर जेटी येथे सायंकाळी पाच वाजता समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघास २० हजार रुपये, द्वितीय संघास १५ हजार रुपये, तृतीय विजेत्या संघास १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या संघास ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. नृत्य कमीत कमी ८ मिनिटे आणि नृत्यात कमीत कमी ८ जण असणे आवश्यक आहे. नृत्य कोणत्याही प्रकारातील चालेल. इच्छुक संघानी आपली नावे मालवण शिवसेना शाखा- दत्तात्रय नेरकर मोबा. ९४२३५१२००१, रुपेश नेवगी मोबा. ८२७५६६३७४४ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

4