कोळंब, मिर्याबांदा गावांना स्मशानशेड मंजूर करा

2

लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी.ता,८:  मालवण तालुक्यातील कोळंब व मिर्याबांदा गावात स्मशानशेड मंजूर करावी. या दोन्ही गावांत स्मशान शेडसाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे ही मागणी लवकर मान्य करावी, अशी मागणी या दोन्ही गावातील स्थानिक लोकप्रतिनिधीनी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे गुरुवारी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, माजी जिल्हा परिषद सभापती अनिल न्हीवेकर, मिर्याबांदा सरपंच नीलिमा परुळेकर, कोळंब सरपंच प्रतिमा भोजणे, शैलेश प्रभुगांवकर, सुनील रेवतळेकर, सुबोध केळुसकर, दादा खडपकर, संघर्ष समिती अध्यक्ष विजय नेमळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

19

4