पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्ग दौरा…

2

सिंधुदुर्गनगरी.ता,०८: पालकमंत्री दीपक केसरकर हे दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येत असून त्‍यांचा जिल्‍हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट २०१९रोजी सकाळी ९.०० वा. जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधिक्षक, प्रांतांधिकारी, तहसिलदार, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सावंतवाडी तालुक्यातील पुरामुळे हानी झालेल्या गावांची पाहणी व पूरग्रस्तांशी चर्चा. सकाळी १०.०० वा. जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधिक्षक, प्रांतांधिकारी, तहसिलदार, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत कुडाळ तालुक्यातील पुरामुळे हानी झालेल्या गावांची पाहणी व पूरग्रस्तांशी चर्चा. नंतर मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोसकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एम.एस.ई.बी, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग नगरी येथे पूरपरिस्थितीचा आढावा बैठक व करावयाच्या उपाययोजनासंदर्भात चर्चा.

15

4