सक्षम सरपंच हाच खरा ग्रामविकासाचा पाया…

210
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अर्चना घारे-परब;बारामतीत सिधुदूर्ग जिल्हा सरपंच आभ्यास दौ-याच्यावेळी व्यक्त केले मत…

सावंतवाडी ता.०८: गावचा सरपंच अभ्यासू,सक्षम व कार्यतत्पर असल्यास तो गाव विकासापासून वंचितव राहत नाही,त्या गावांचा शाश्वत विकास झालेला पहायला मिळतो.सक्षम सरपंच हाच खरा ग्रामविकासाचा पाया आहे.माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात सुद्धा सरपंचपदापासून झाली आहे.त्यामुळे सरपंचांना गावचा विकास करताना येणाऱ्या अडचणींची मला जाणीव आहे.असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी विधानसभा पक्ष निरीक्षक अर्चना घारे यांनी व्यक्त केले.

बारामती कृषी विज्ञान केंद्रात आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच,उपसरपंच अभ्यास दौ-याच्यावेळी सौ.घारे बोलतं होत्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेच्या माध्यमातून नुकत्याच सरपंच उपसरपंच यांच्यासाठी चार दिवसांपासून औरंगाबाद येथील आदर्श गाव पाटोदा,अहमदनगर (शिर्डी) येथील शासकीय सरपंच/उपसरपंच मेळावा,कृषी विज्ञान केंद्र बारामती,सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचे गावं भिलार या गावामध्ये अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.दौऱ्यात दोडामार्ग,सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली येथील ७५ सरपंच, उपसरपंच यांचेसह अनेक महिला सरपंच देखील सहभागी झाल्या होत्या.
या अभ्यास दौ-या दरम्यान कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे सौ.घारे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उपस्थित सरपंच,उपसरपंच यांची भेट घेऊन त्याच्याशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या,ग्राम विकासाची कामे करत असताना जास्तीत-जास्त लोकांना सहभागी करुन घ्यायला हवे.ग्राम विकास करत असताना लोक सहभाग असणे देखील तितकेच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी सरपंच कार्यक्षम होण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यास दौरा आयोजित करण्याची गरज असल्याचे मत सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी व्यक्त केले.तर जिल्हा सचिव दादा साईल यांनी अभ्यास दौरा निमित्ताने उपयुक्त माहिती चा फायदा सर्व सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या गावासाठी करावा असे आवाहन केले.सरपंच दिक्षा महालकर म्हणाल्या या आभ्यास दौरयातुन आम्हाला देखील प्रेरणा मिळाली.आपणही असे काम करू शकतो असा विश्वासत्यांनी व्यक्त केला. हा अभ्यास दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चित फलदायी ठरणार असून यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरपंच व उपसरपंच यांच्या साठी काँन्सफरन्स आयोजित करावी,अशी विनंती करुन सौ.घारे यांनी अभ्यास दौ-या साठी केलेल्या सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल प्रविण गवस यांनी जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, सचिव दादा साईल,विभागीय सचिव संतोष राणे, दोडामार्ग सरपंच संघटना अध्यक्ष प्रविण गवस,जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.

\