शिरशिंगे-गोठवेवाडी येथे डोंगराला भेगा…

2

पायथ्याची घरे भीतीच्या छायेखाली;नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश…

सावंतवाडी ता.०८: शिरशिंगे-गोठवेवाडी येथे डोंगराला भेगा जाऊन डोंगर खचल्याचा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला.त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ४० ते ४५ घरांना धोका निर्माण झाला आहे.त्यातील १२ ते १३ घरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिले आहे.
गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घातला आहे.दरम्यान आज पावसाचा जोर काहीशा प्रमाणात कमी झाला.मात्र याठिकाणी झालेल्या पावसामुळे रस्ते डोंगर खचलयाच्या घटना समोर आल्या आहेत.आज दुपारी येथील शिरशिंगे-गोठवेवाडी येथे मानवी वस्ती शेजारी असलेला डोंगर दूभंगल्याचे वृत्त समोर आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा डोंगर कधीही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे डोंगर पायथ्याशी राहणारे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

0

4