2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
रस्ते खचले,लोकांच्या घरात शिरले पाणी
ओटवणे ता.०८: येथील परिसरात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून,दाभिल येथेही दरड कोसळून रस्त्यावर आली आहे.तर सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर असलेल्या झोळंबे दापटेवाडी येथे डोंगर खचून माती घरात व बागायतीत घुसून नुकसान झाले आहे.ओटवणे दशक्रोशीत ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजविला आहे.तांबोळी,असनिये,घारपी या ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक बंद आहे.तर सरमळे धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या दाभिल गावातही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
दाभिल मध्ये नदीचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर असलेल्या झोळंबे दापटेवाडी येथे बुधवारी रात्री डोंगर खचल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.ग्रामस्थांनी रात्रीच आपली घरे सोडून लगतच्या वाडीतील घरांचा आसरा घेतला .
Download WordPress Themes Nulled and plugins.
4