आंबोली घाटाच्या दुरावस्थेला केबल खोदाई जबाबदार…

420
2

परिमल नाईक:तक्रार केल्यानंतर सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप…

सावंतवाडी ता .०८: आंबोली घाटाच्या दुरावस्थेला त्याठिकाणी टाकण्यात आलेल्या खाजगी मोबाईलच्या केबल जबाबदार आहेत.असा आरोप सावंतवाडीचे नगरसेवक परिमल नाईक यांनी केला आहे.याबाबत आपण यापूर्वी तहसीलदार तथा बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते,परंतु दुर्दैवाने दोन्ही यंत्रणांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही,असे त्यांनी म्हटले आहे.
यावर त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.याबाबत त्यांनी असे म्हटले आहे, की आंबोली घाट रस्त्याची दुरवस्था झाली ती केवळ रस्त्यावरील चुकीच्या पध्दतीने केबलचे काम झाल्या मुळे,याबाबत आपण व पत्रकार अमोल टेंबकर यांनी आवाज उठवला होता. तसेच सावंतवाडी तत्कालीन तहसीलदार तसेच बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.परंतु संबधित अधिकारी यानी अर्थपूर्ण व सोयिस्करपणे सदर गंभिर घटनेकडे डोळेझाक करुन आपल्या जबाबदारया केविलवाणी प्रकारे झटकल्या.सगळ्यात नवलाईची बाब म्हणजे सावंतवाडी तालुक्या बरोबरच जिल्हा लोकप्रतिनिधीनी सुद्दा सदर बाब नजरअंदाज करताना हेतुपुरस्सररित्या दुर्लक्ष केल्यानेच सदर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे.व भविष्यात सुद्दा आणखी गंभीर परिणामाना सामोरे जावे लागले अशी साधार भीती सामान्य जनते समोर निर्माण झाली आहे.

4