बीडीओंना निवेदन:तालुक्यातील ग्रामसेवकांची भूमिका…
सावंतवाडी,ता.०८ : जिल्ह्यात आपत्ती असताना ग्रामसेवक संघटनांकडून करण्यात आलेले आंदोलन चुकीचे आहे. मात्र या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही अशी भूमिका तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी घेतली आहे.
पुकारलेल्या उद्याच्या आंदोलनात आमचा सहभाग नसल्याचे निवेदन प्रवीण नेमण, प्रसाद ठाकुर व अर्जुन कुबल या ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी गजानन भोसले यांना दिले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती असतांना ग्रामस्थरावरच्या कर्मचार्यांची मुख्यालयी आवश्यकता असल्याने अशी आंदोलने आम्हास मानवता धर्माच्या विरुध्द वाटते. त्यामुळे उद्याच्या आंदोलनात आमचा सहभाग राहणार नाही असे म्हटले आहे.