कुडाळ महाराष्ट्र स्वाभिमान कडून तहसीलदारांकडे मागणी…
कुडाळ ता०८: गेल्या चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे.त्यामुळे संबंधित शेतकर्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक असलेले पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश महसूल व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली आहे.
आज त्यांनी कुडाळ तहसीलदारांची भेट घेवून निवेदनाद्वारे ही मागणी केली.यावेळी शेतकऱ्यांची नुकसानी लक्षात घेता तात्काळ पंचनामे करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी,मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कुडाळ स्वाभिमान तालुका अध्यक्ष विनायक राणे,स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष दीपक नारकर, नगरसेवक सुनील बांदेकर, प समिती सदस्य संदेश नाईक,माजी पंचायत समिती सदस्य अण्णा भोगले,युवक जिल्हा सरचिटणीस देवेन्द्र नाईक,सिदेश देसाई,सुभाष नाईक,रोशन दाभोलकर, मनीष वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.