गोव्यात पेट्रोलचा तुटवडा नाही :परेश जोशी

2
  • पणजी ता 8
    मुसळधार पाऊस आणि घाट रस्ते बंद असले तरी गोव्यात पेट्रोल आणि डिझेलचा अजिबात तूटवडा नाही.लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन गोवा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष परेश जोशी यांनी केले आहे.
    घाट रस्ते बंद असण्याचा आणि पेट्रोल,डिझेलच्या तूटवडयाचा दुरान्वये संबंध नसल्याचे स्पष्ट करून जोशी म्हणाले,गोव्यात पेट्रोल समुद्र मार्गे येते.त्यामुळे आजच्या घडीला तरी त्याचा अजिबात तूटवडा नाही.त्यातही पेट्रोल डिझेलचा तूटवडा होणार असेल तर कंपन्या त्याची पूर्व कल्पना देतात.
    आणिबाणीच्या प्रसंगात 15 दिवस पुरेल इतका इंधन साठा कंपन्यांकडे असतो.त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून घाबरुन जाण्याची गरज नाही,असे देखील जोशी यांनी स्पष्ट केले आहे..त्यातही पेट्रोल डिझेलचा तूटवडा होणार असेल तर कंपन्या त्याची पूर्व कल्पना देतात.
    आणिबाणीच्या प्रसंगात 15 दिवस पुरेल इतका इंधन साठा कंपन्यांकडे असतो.त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून घाबरुन जाण्याची गरज नाही,असे देखील जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
4