Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामेढ्यातील नागरिकांच्या शिवसेना प्रवेशाने आचरेकरांच्या पायाखालची वाळू सरकली...

मेढ्यातील नागरिकांच्या शिवसेना प्रवेशाने आचरेकरांच्या पायाखालची वाळू सरकली…

आमच्यावर केलेले आरोप समोर येऊन सिद्ध करावेत ; नरेश हुलेंचे आचरेकरांना आव्हान…

मालवण, ता. ८ : मेढ्यातील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नगरसेवक सुदेश आचरेकर यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते प्रवेशाबाबत खोटे आरोप करताहेत. ते आपल्या प्रभागातील विकासकामांकडे लक्ष देत नसल्याने मेढ्यातील नागरिकांनी आमदार वैभव नाईक यांच्या कामाची सचोटी तसेच नगराध्यक्षांची कार्यपद्धती पाहून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आचरेकरांनी नागरिकांच्या समोर येत केलेले आरोप सिद्ध करावेत असे आव्हान प्रवेशकर्त्या नागरिकांच्यावतीने नरेश हुले यांनी दिले आहे.
शहरातील मेढ्यातील शंकर मंदिर परिसरातील नागरिकांनी नुकताच आमदार नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश आचरेकरांसाठी मोठा धक्का मानला गेल्यानेच त्यांनी प्रवेशकर्त्यांवर खोटे आरोप केले आहेत. काही कार्यकर्ते गैरसमजुतीने शिवसेनेत गेले असून काही फसवणुकीने तर काही मनापासून गेलेले नाहीत. शंकर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राजकारण करून लोकांची फसवणूक करून त्यांना शिवसेना शाखेत बोलाविले असे खोटे आरोप त्यांनी केले. या आरोपानंतर शिवसेना प्रवेशकर्त्या नागरिकांची बैठक शंकर मंदिरात नरेश हुले यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत आचरेकर यांच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले.
स्वतःला किंगमेकर म्हणविणार्‍या सुदेश आचरेकर यांनाच किंगमेकर बनविण्यामध्ये कोणाचा हात होता हे प्रभागातील तसेच शहरातील सर्वसामान्यांना माहित आहे. प्रभागातील नागरिकांची साथ असल्याशिवाय कोणी एकटा किंगमेकर होत नाही. आतापर्यंत आम्ही आचरेकर यांच्या पाठीशी राहिलो होतो. मात्र त्यांना याची जाणीव नाही. प्रभागात विकासात्मक कामे न करता विकासकामे करण्यास कोणी आल्यास त्याला आडकाठी करण्याचे काम आचरेकरांनी केले आहे. त्यामुळेच प्रभागाच्या विकासासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. आमच्यावर कोणीही जबरदस्ती केली नाही असे हुले यांनी स्पष्ट केले.
शंकर मंदिरासाठी १० लाख रुपयांच्या देणगीचा विषय हा आचरेकर यांनी आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून केलेली सारवासारव आहे. आपल्या खोटारडेपणासाठी शंकर मंदिराच्या नावाचा वापर करणे आचरेकरांना शोभत नाही. आचरेकरांचा जसा शंकर मंदिरावर विश्वास आहे, तसा आमच्या प्रभागाच्या नागरिकांचेही ते श्रद्धास्थान आहे हे आचरेकर यांनी लक्षात ठेवावे. आमच्या शिवसेना प्रवेशामुळे आचरेकर यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते बेताल वक्तव्ये करत असल्याची टीकाही श्री. हुले यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments