दीपक केसरकर;तहसीलदारांना दिले आदेश,उद्या होणार वाटप…
दोडामार्ग /तन्मय नाईक ता.०८: येथील तिलारी परिसरातील स्थलांतरित करण्यात आलेल्या ५४ पूरग्रस्त कुंटुबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात यावी,असे आदेश आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांना दिले.दरम्यान त्यांना खाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी त्यात कोणतीही गय केली जाऊ नये असेही यावेळी त्यांनी सांगितले.
श्री.केसरकर यांनी आज सायंकाळी दोडामार्ग तिलारी येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली.यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, बाबुराव धुरी, गणेशप्रसाद गवस, संपदा देसाई आदी उपस्थित होते.
.तिलारीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे तेथील कुडासे-भरपाल,शिरंगे,भेडशी आदी भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.यात अनेक घरे पाण्याखाली गेली होती.त्यामुळे तेथील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.चुकीच्या पद्धतीने तिलारीच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडले असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.दरम्यान या पार्श्वभूमीवर आज श्री.केसरकर यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.