मालवण, ता. ८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ हजारापेक्षा जास्त मच्छीमार कुटुंब १२१ कि.मी.च्या किनारपट्टीवर राहत आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. परंतु दरवर्षी नैसर्गिक आपत्तीस या समाजास तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या आपत्तीस कायमस्वरूपी तोडगा म्हणून या किनारपट्टीवर फिशरमन इकॉनॉमी झोन मंजूर व्हावा, अशी मागणी जिल्हा भाजपावतीने बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.
तळाशील, देवबाग, तारकर्ली या भागात गेले काही दिवस नदी व समुद्राच्या पाण्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवाना या स्थितीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपवतीने या भागात भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, धोंडी चिंदरकर, समीर बावकर, प्रकाश परब, संतोष गावकर, बबलू राऊत, अविनाश सामंत, सौ. समीक्षा खोबरेकर, नरेंद्र मेस्त, मिलिंद झाड, रवींद्र खानविलकर आदी उपस्थित होते. यावेळी मोंडकर यांनी झालेल्या नुकसानी विषयी पाहणी करून प्रशासनास पंचयादी घालून मदत करावी असे सांगितले.
बाबा मोंडकर यांनी यावेळी मच्छीमारांशी संवाद साधला. राज्य सरकारचा धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी असलेला निधी व जिल्ह्याच्या १२१ कि.मी. किनारपट्टीवर होणाऱ्या खर्चाचा विचार करता हा झोन मंजूर झाल्यास त्या माध्यमातून मच्छीमार बांधवाना रस्ताकम बंधारा, ब्रेकवाँटर, गाळ उपसा पाणी, वीजपुरवठा, आरोग्य, मासेमारीसाठी आवश्यक सुविधा किनारपट्टी उपलब्ध होणार आहेत. यासाठी मच्छीमार बांधवाना केंद्रस्थानी मानून केंद्र सरकारचा निधी यासाठी उपलब्ध होऊ शकतो. तसेच किनारपट्टीवरील मोकळी (शेरी जमिन) वापरण्या संदर्भात शासनाचे कुठलेही धोरण नसल्यामुळे ही जागा पडीक असून मच्छीमार वापरू शकत नाही. त्यामुळे हा झोन झाल्यास या जमिनी स्थानिक मच्छीमार आपल्या व्यवसाय वाढीसाठी, उपजीविकेसाठी वापरू शकतात. याविषयी जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांना सोबत घेऊन जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या माध्यमातून हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल, असे श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या किनारपट्टीवर “इकॉनॉमी झोन” मंजूर करावा…_* *_भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांकडे मागणी; बाबा मोंडकर यांची माहिती…
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4