किनारपट्टीसह काळसे बागवाडी भागाची माजी खासदार नीलेश राणेंकडून पाहणी

2

मालवण ता.०८: काळसे बागवाडीमध्ये यंदा महापूर आला असून ग्रामस्थांची घरे ) पाण्याखाली गेली आहेत.दरम्यान माजी खासदार राणे यांनी काळसे सातेरी मंदिरात ग्रामस्थांची भेट घेतली.यावेळी काळसे बागवाडी गावात प्रशासकिय आपत्कालीन यंत्रणा अद्यापपर्यंत पोहोचली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.तसेच बागवाडीमध्ये पाणी न घुसलेल्या परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडीत करण्यात आल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
गावात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, यानंतर निलेश राणे यांनी तळाशिल येथे भेट देऊन येथील सागरी किनारपट्टीची पहाणी केली. मागील पाच वर्षात याठिकाणी बंधा-याचा एकही दगड न लागल्याने तळाशिल किनारपट्टीची धूप होत असून सागरी अतिक्रमण वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मागीलवर्षी आपण स्वत: येथे बंधारा घालून दिला होता. त्यानंतर राणेच्या माध्यमातून शासनाकडे तळाशिलसाठी बंधाºयाचा प्रस्ताव पाठविला असून याचा तातडीने पाठपुरावा करुन हा बंधारा पूर्ण करुन घेण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली आहे. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, तळाशिल येथील संजय तारी, अण्णा कोचरेकर, बागवाडी येथील श्री. कोळगे, पोलीस पाटील विनायक प्रभू यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

18

4