आंबोली घाटाला सुरू करणार तळकट-कुंभवडे पर्यायी रस्ता…

816
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर: घाटाच्या नुकसानीचे पैसे मोबाईल कंपनीकडून वसुल करणार…

सावंतवाडी ता.०९: आंबोली घाटाला पर्यायी रस्ता म्हणून तळकट-कुंभवडे रस्ता वापरण्यात येणार आहे.आजपासून तो रस्ता सुरू करण्यात येणार आहे.तर मुख्य धबधब्याच्या ठिकाणी कोसळलेल्या रस्त्याच्या बाजूची माती काढुन रस्ता सुरळीत करण्यात येणार आहे.तोपर्यंत रात्रीसाठी घाट वाहतुकीसाठी बंद राहिल अशा सुचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला.दरम्यान घाटात मोबाईल कंपनीच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने खोदाई झाल्यामुळे घाट रस्ते कोसळले,त्यामुळे या कामाची चौकशी केली जाईल,त्याच बरोबर त्या कंपनीकडुन हा खर्च वसूलही केला जाईल असे श्री.केसरकर यांनी सांगितले
श्री केसरकर यांनी आज आंबोलीत जावून घाटाची पाहणी केली.यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, सार्वजनिक बांधकामचे युवराज देसाई,अनंत निकम आदी उपस्थित होते.यावेळी केसरकर म्हणाले आंबोलीत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे वरच्या बाजूने लावलेल्या जाळयांना दगड अडकून घाट धोकादायक आहे.ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत,त्याठिकाणी डोंगराचा काही भाग कापून रस्ता सुरळीत करण्यात येणार आहे.
आंबोली घाटाला पर्यायी रस्ता म्हणून तळकट-कुंभवडे रस्ता सुरू करण्यात येणार आहे.त्यात सद्यस्थितीत तो रस्ता चांगला आहे.त्यातील काही भाग वन विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे प्रवाशांना व वाहनधारकांना काही त्रास सहन करावा लागणार आहे.दरम्यान आंबोली घाट मार्ग आता किमान अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.छोट्या गाड्या तिथून सोडण्यात येणार आहेत तर घाटाचे झालेले नुकसान संबंधित मोबाईल कंपनीकडून वसूल करण्यात येणार आहे.तसेच चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामाची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहे.

\