Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीचा आठवडा बाजार होळीचा खुंट परिसरात भरवा...

सावंतवाडीचा आठवडा बाजार होळीचा खुंट परिसरात भरवा…

उभा बाजार परिसरातील नागरिकांची,नगराध्यक्ष बबन साळगावकरांकडे मागणी…

सावंतवाडी.ता,०९: येथील उभाबाजार परिसरात भरवण्यात येणारा मंगळवारचा आठवडा बाजार होळीचा खुंट परिसरात भरण्यात यावा.परिसरातील लोकांचा रहिवाशांचा व दुकानदारांचा होणारा त्रास लक्षात घेता,याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी उभा बाजार येथील नागरिकांनी आज नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे,की उभाबाजार परिसरात बाजार भरविण्यात येत असल्यामुळे तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.चारही रस्त्यावरून वाहने काढता येत नाहीत.संध्याकाळी पावसाच्या वेळी कसरत करावी लागते,तेथे येणारे दुकानदार लांबलचक दुकाने लावत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.त्यामुळे आठवडा बाजार मोकळ्या ठिकाणी असलेल्या होळीचा खुंट परिसरात हा बाजार भरावावा असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी किरण हळदणकर ,सदानंद तेंडले,रामचंद्र कोरगावकर,आनंद मडगावकर, विलास वाळके, कुंदन टोपले,अरुण भिसे ,नरेंद्र मसुरकर, प्रशांत वाळके, प्रदीप गोंजारी, गजानन टंगसाळी, ओंकार मसुरकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments