वेंगुर्ले पंचायत समितीसमोर प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन…

2

वेंगुर्ले ता.०९ तालुका ग्रामसेवक संघटने तर्फे आज येथील पंचायत समिती कार्यालया समोर प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केरण्यात आले आहे.
ग्रामसेवक युनियनने सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित सर्वत्र ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढ करणे,ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल होऊन पदवीधर ग्रामसेवक नेमणुका होणे,ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे, ग्रामसेवकांना प्रवास भत्ता शासन निर्णयानुसार मंजूर करणे यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आजचे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे.
या आंदोलनात ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष गणेश बागायतकर सचिव प्रल्हाद इंगळे यांच्यासह सर्व ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. या आंदोलनकर्त्यांना पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, उपसभापती स्मिता दामले, पंचायत समिती सदस्य यशवंत परब, सिद्धेश परब आदींनी भेट दिली.

0

4