शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी वेगुर्ल्यातुन पाठवली आठ हजार पत्रे

2

सावंतवाडी.ता,९:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती, जिल्हा सिंधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांनी लिहिलेली सुमारे ८००० पत्रं वेंगुर्ले पोस्टमास्तर श्री पी एम गावडे यांच्याकडे देण्यात आली.
कृती समितीने आव्हान केल्याप्रमाणे माणगांव खोऱ्यासह दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील २५,००० पेक्षा जास्त बंधू – भगिनींनी “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय” सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावे, या मागणी साठी मुख्यमंत्र्यांना हि पोस्टकार्ड लिहिली आहेत.
यावेळी कृती समिती समन्वयक अँड शामराव सावंत, विजय रेडकर, स्टीव्हन कार्डोस, वेलांकनी कार्डोस, प्रा सचिन परुळकर, विशाल धावडे, सुरज राणे, किरण राऊळ, अशोक दाभोळकर, प्रा बाबुराव खवणेकर, दीपक गावकर, अभय किनळॊस्कर , भगवान रेडकर, अँड्रयू फर्नांडिस, सीए लक्ष्मण नाईक व डॉ मनस्वी राऊळ उपस्थित होते.
२५,००० पेक्षा जास्त नागरिकांनी या मागणीसाठी सक्रिय सहभाग नोंदवला, याबाबत समन्वयक अँड शामराव सावंत यांनी समाधान व्यक्त केले, तसेच निधीची उपलब्धता व जागेची निश्चिती होईपर्यंत हा “जनरेटा” सुरूच ठेवू असे घोषित केले.

0

4