दोडामार्ग मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अर्चना घारे धावल्या…

304
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग ता.०९: तालुक्यात पूरपरिस्थितीत अडकलेल्या मणेरी,साटेली,भेडशी,पोखरण येथील आपदग्रस्तांना राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा पक्षनिरीक्षक सौ.अर्चना घारे-परब यांनी मदतीचा हात दिला.यावेळी त्यांना आवश्यक असलेले जीवनावश्यक सामान देऊन त्यांचे घरगुती सामान सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी सहकार्य केले.
मागील काही दिवसंपासूनचा पावसाचा जोर आणि धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे दोडामार्ग येथे अनेक गावांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.साटेली,भेडशी,मणेरी,खोकरल,खानियाल या ठिकाणी घरात पाणी घुसल्याने येथील ग्रामस्थांना राहत्या घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी शाळांमध्ये, आरोग्य उपकेंद्रांमध्ये स्थलांतरित केले आहे.सुदैवाने या आपात्कालीन परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यावेळी सौ.घारे-परब यांनी प्रत्यक्ष जाऊन या ग्रामस्थांची भेट घेतली,त्यांची विचारपूस केली.अडचणीच्या काळात आम्ही सर्वजन आपल्या सोबत आहोत.काळजी करू नका असे सांगत आधार दिला.गावकऱ्यांचे सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी देखील त्यांनी मदत केली.गरजू लोकांना आवश्यक वस्तूंचे,खाद्य पदार्थांचे वाटप केले.
यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती अनिषा दळवी, सरपंच विशांत तळवडेकर, ग्रा प.सदस्य कल्पेश करमळकर, श्री. वस्त, श्री.नांदोडकर आणि अर्चना फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

\