असनियेतील १८ कुटुंबांचे स्थलांतर

708
2
Google search engine
Google search engine

कोसळलेल्या दरडींची राजन तेलींनी केली पाहणी

ओटवणे.ता,९: असनिये येथे कोसळणाऱ्या दरडींचा धोका पाहता,कणेवाडी येथील १८ घरांतील ग्रामस्थांनी अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.पार्श्वभूमीवर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी शुक्रवारी सदरचे निर्देश दिले.असनिये प्राथमिक शाळा येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान असनियेत कोसळलेल्या दरडींची माजी आ.तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी पाहणी केली.
असनिये कणेवाडी येथे मंगळवार पासून दरडी कोसळत असून,असनिये घारपी रस्ता दरडीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.या ठिकाणी पडलेली दरड दिवसेंदिवस विस्तारत असून,याचा धोका लगतच्या १८ घरांना निर्माण झाला आहे.त्यामुळे तहसीलदार राजराम म्हात्रे यांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत कणेवाडी येथील १८ घरांना नोटीशी बजावून स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.या १८ घरांमधील ग्रामस्थांची सोय असनिये प्राथमिक शाळा येथे करण्यात आली आहे.
दरम्यान,माजी आ.तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी असनियेत कोसळलेल्या दरडींची पाहणी केली.सदरची दरड हटवून ग्रामस्थांच्या पर्यायी मार्गासाठी संबंधित मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन श्री.तेली यांनी दिले.यावेळी दीपक गावडे,मधुकर ठिकार,प्रथमेश तेली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.