Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता. ९ : कणकवली आचरा मार्गावरील वरवडे येथे भलामोठा वटवृक्ष रस्त्यावर कोसळल्याने कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेले चार दिवस आजरा मार्गावर पुराचे पाणी असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. पावसाचा जोर ओसरल्यानंतर काल सायंकाळी या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. आज दुपारी अडीचच्या सुमारास वरवडे येथे वटवृक्ष कोसळल्याने आचरा मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनाकडून हा वटवृक्ष बाजूला काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.