वेंगुर्लेत रोटरॅक्ट, इंटरॅक्ट व रोटॅकिडसचा उद्या पदग्रहण सोहळा

144
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.९: वेंगुर्ले येथील रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या रोटरॅक्ट, इंटरॅक्ट व रोटॅकिडस् क्लबचा पदग्रहण सोहळा शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.
रोटरॅक्ट प्रेसिडेंट हेमंत गावडे, सेक्रेटरी अभिषेक साळगांवकर, सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंटरॅक्ट प्रेसिडेंट सानिका नेरुरकर, सेक्रेटरी आदित्यराज सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सिधुदुर्ग रोटरी असिस्टंट गव्हर्नर रो.वसंत करंदीकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष तथा रोटरी डिस्ट्रिक्ट ऑफिसर रो.दिलीप गिरप, रो.संजय पुनाळेकर, रो.सचिन वालावलकर, रोटरी क्लब प्रेसिडेंट रो. राजेश घाटवळ, सेक्रेटरी रो.सुरेंद्र चव्हाण, व्हाईस प्रेसिडेंट रो. गणेश अंधारी, ट्रेझरर रो.नागेश गावडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोटरॅक्ट क्लब, इंटरॅक्ट क्लब सिधुदुर्ग विद्यानिकेतन, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, होमिओपॅथी मेडिकल कॉलेज तसेच रोटॅकिडस् पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. तरी या पदग्रहण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

\