भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांनी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस व पाल गावातील नुकसानग्रस्त भागाची केली पहाणी

167
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले.ता,९: भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस-काजरमळी, तुळस-पलतड, पाल- गोडवणेवाडी येथील नुकसानीची पहाणी केली. तसेच स्थलांतरीत केलेल्या ग्रामस्थांना भेट देवून त्यांना धीर दिला.
तुळस – पलतडवाडीतील २८ कुटुंबे प्राथमिक शाळेत स्थलांतरीत केली आहेत. त्याठिकाणी भेट देवून त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. तसेच प्रशासनाकडुन तातडीची मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याशी तिकडून संपर्क साधला. तसेच पलतडवाडीतील खचलेल्या रस्त्याची त्याचप्रमाणे काजरमळी येथील खचलेल्या डोंगराची पहाणी केली. यावेळी तुळस सरपंच शंकर घारे, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, मंडल अधिकारी जाधव, तलाठी सौ.वजराठकर, क्रुषीअधीकारी कुलकर्णी, केसरकर, खडपकर , ग्रामपंचायत सदस्य चंद्रे परब , रामु परब, वैभव परब, दिगंबर परब तसेच वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

\