वेंगुर्ले.ता,९: वेंगुर्ले तालुक्यामध्ये ठीक-ठीकाणी अतिवृष्टी व वादळाचा फटका बसुन ग्रामस्थांचे नुकसान झाले. त्यांना तातडीची मदत म्हणून भाजपा चे प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांना मदत करण्यात आली.
आडेली येथील भाजपाचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते व प्रसिद्ध मुर्तीकार आपा ठाकुर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घरासहीत गणेश मुर्तीची मोडतोड झाली. त्यांना तातडीची मदत म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ताडपत्री देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र आडेलकर, प्रशांत देसाई , शांताराम धुरी, विजय पुनाळेकर, भरत आडेलकर, नरेश लाड उपस्थित होते.