नुसती आश्वासने नको,आधी पुर्नवसन करा

167
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संजू परब: पालकमंत्री दीपक केसरकरांना टोला

सावंतवाडी ता.०९: पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आदि शिरशिंगे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे व नंतरच गोठवेवाडी ग्रामस्थांना आश्वासन द्यावे,अशी टीका स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली.श्री.परब यांच्या संपर्क कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ,यावेळी ते बोलत होते.
श्री.परब पुढे म्हणाले,आपण डोंगर खचलेल्या ठिकाणी आज भेट देत तेथील लोकांशी संवाद साधला.दरम्यान याआधी पालकमंत्र्यांनी याठिकाणी जाऊन डोंगर खचलेल्या भागाची नुसती पाहणी केली.मात्र संबंधित अधिकाऱ्यांना सर्व्हे करण्याचे कोणतेही आदेश न देता तेथील लोकांना नुसती पुनर्वसनाची खोटी आश्वासने देऊन माघार घेतली.या ठिकाणची परिस्थिती पाहता तेथील लोकांना तात्काळ पुनर्वसनाची गरज आहे.मात्र पालकमंत्री दिलेल्या आश्वासनावर तेथील नागरिक नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले
डोंगर खचून तीन दिवस उलटले तरी जिल्हाधिकारी श्री.पांढरपट्टे यांनी सुद्धा या भागाची पाहणी केली नाही.त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना सुद्धा आत्ता गांभीर्य उरले नाही,असा आरोपही त्यांनी यावेळी केला.दरम्यान इन्सुली बांदा परिसरातील पूरग्रस्तांना सुद्धा नुसती श्री.केसरकरांनी आश्वासने दिल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पंचायत समिती माजी सभापती रवींद्र मडगावकर युवक शहर अध्यक्ष मनोज नाटेकर आदी उपस्थित होते.

\