माध्यमिक अध्यापक संघाने छेडले संघर्ष धरणे आंदोलन

2

सिंधुदुर्गनगरी.ता,९: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने खाजगी शाळातील कर्मचारी विनियमन अधिनियम १९७७आणि नियम १९८१ मधील मसूदा बदलण्याची अधिसूचना शासन निर्णय जारी केला आहे. ही अधिसूचना तात्काळ रद्द करावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने शुक्रवारी जिल्हाधिकारी प्रवेशद्वारासमोर संघर्ष धरणे आंदोलन छेडले.
यावेळी अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, कार्यवाह पांडुरंग काळे, शिवराम सावंत, सतीश शिंदे, जयसिंगराव वाघमोडे, संभाजी कोरे, मेघना राऊळ, विठ्ठल सावंत, एस एस शिरोडकर आदी सभासद उपस्थित होते. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने हे आंदोलन छेडले. माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतन निश्चिती व इतर भत्ते याबाबत शासनाचा एकाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न १९७७-७८मधील ५४ दिवसांच्या संपाने मोडीत निघाली. वेतनश्रेणी, महागाई भत्ता व इतर भत्ते देण्याची वैद्यानिक व्यवस्था यावेळी निर्माण झाली. त्याला प्रशासकीय व्यवस्थेचे रूप देण्यात आले. तरीही महाराष्ट्र शासनाने यातील मसूदा बदलण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले.

0

4